महात्मा ज्योतिबा फुले जयंती विशेष....
मानवतेचे महान पुजारी,बहुजनांचे उद्धारक,समता, स्वातंत्र्य,न्याय व बंधुता या चतु:सुत्रीवर आधारित समाजनिर्मितीचा ध्यास ठेवून आयुष्यभर झगडणारे क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती व विचारास विनम्र अभिवादन!
ज्योति गोविंद फुले
-----------------------
दीन-अबलांची पाहुन दु:खे काळिज ज्याचे उले,
तेच हे ज्योति गोविंद फुले...!
तहानलेल्या अस्पृश्यांना
घरचे पाणी दिले
तेच हे ज्योति गोविंद फुले...!
बहुजनांसह महिलांनाहि
शिक्षण केले खुले
तेच हे ज्योति गोविंद फुले...!
शिवरायांच्या शिवसमाधिस
प्रथम वाहिली फुले
तेच हे ज्योति गोविंद फुले...!
शेतक-यांच्या दु:खांनाहि
वेशीला टांगले
तेच हे ज्योति गोविंद फुले...!
आमच्यासाठी जीवन जाळून
आमचे केले भले
तेच हे ज्योति गोविंद फुले...!
बालाजी मोरे,कौठा
मो.9921439198