हिंगोली :- शहरातील सर्व व्यापारी व्यापारी बांधवांना कळविण्यात येते मा. जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या आदेशानुसार किराणा आणि जीवनावश्यक वस्तूचे विक्रेत्यांनी आपल्या दुकानात दर अथवा वस्तूवर दरपत्रक लावणे बंधनकारक आहे. दरपत्रक न लावणे असे आढळल्यास ₹ 5000 हजार रुपये दंड करण्यात येईल.जर दुसरी वेळेस हा गुन्हा झाला तर फौजदारी कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी. आपल्यावरील अप्रिय कारवाई टाळण्यासाठी आपल्या दुकानात किराणा आणि जीवनावश्यक वस्तूंचे दरपत्रक लावणे अनिवार्य आहे, अशी रामदास पाटील मुख्याधिकारी नगर परिषद हिंगोली यांनी माहिती दिली आहे.
***
हिंगोली शहरातील सर्व व्यापाऱ्यांना वस्तूंचे दरपत्रक लावने बंधनकारक