भीमा तू नसता तर.....


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष....


 


भीमा तू नसता तर.....
असता तोचि जोहार,
झाला असता किती अत्याचार,
आणि अन्यायाचे वार
भीमा तू नसता तर.....!!1!!


झाल्या असत्या असहय वेदना,
किती सोसाव्या यातना,
पूर्ण नसत्या झाल्यात मनोकामना भीमा, तु नसता तर.....!!२!!


असतो पाण्यापासून दूर,
  नयनी अश्रूंचा पूर,
मनी वेदनांचा सुर,
भीमा, तू नसता तर.......!!३!!


फिरलो नसतो कोटात,
बसलो नसतो चार लोकात,
अन जगलो नसतो असे थाटात
भीमा तू नसता तर....!!४!!


तुझ्यामुळे झाली टोकदार,
आमच्या लेखणीची धार,
अन्यायावर झाला नसता प्रहार,
भीमा तू नसता तर.....!!५!!
----------------------------------------
कवी- राहुल रतन इंगोले,
मु. पो. पुसेगाव, तालुका- सेनगाव जिल्हा- हिंगोली.
मो.९७६७६६६१४८