नातेवाईक, मित्रमंडळींना भेटा, करोनाची भीती दूर होईल : प्रकाश आंबेडकर


करोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे लोकांमधील संवादच संपलेला नाही तर लोक एकमेकांना भेटायला सुद्धा घाबरत आहेत. यातून जनतेची सुटका झाली पाहिजे. सरकार सध्या काही भूमिका घेईल असे वाटत नाही. त्यामुळे लोकांनी सरकारवर अवलंबून न राहता त्यांनी आपल्या आयुष्याची सुरवात केली पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी आपले मित्रमंडळी, नातेवाईक यांना भेटायला सुरुवात करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.


मुंबई: करोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे लोकांमधील संवादच संपलेला नाही तर लोक एकमेकांना भेटायला सुद्धा घाबरत आहेत. यातून जनतेची सुटका झाली पाहिजे. सरकार सध्या काही भूमिका घेईल असे वाटत नाही. त्यामुळे लोकांनी सरकारवर अवलंबून न राहता त्यांनी आपल्या आयुष्याची सुरवात केली पाहिजे. त्यासाठी नागरिकांनी आपले मित्रमंडळी, नातेवाईक यांना भेटायला सुरुवात करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.


या देशात अनेक व्हायरस येऊन गेले. आपण त्यांना यशस्वीरित्या तोंड दिले आहे. करोना व्हायरसला सुद्धा आपण तोंड देऊ. त्यासाठी आपल्या सामाजिक जीवनाला सुरुवात झाली पाहिजे. ज्या पद्धतीने मीडिया आणि शासनाने करोना व्हायरस संदर्भात बातम्या दिल्या आहेत आणि ज्या पद्धतीने शासनाने कार्यक्रम आखला आहे, कदाचित तो खरा ही असेल. पण आता कुठेतरी लोकांची सुटका झाली पाहिजे. अशी आजची परिस्थिती आहे. मात्र याबाबत सरकार काही भूमिका घेईल असे आपल्याला वाटत नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.


सामान्य लोकांनी आपल्या आयुष्याची नव्याने सुरुवात केली पाहिजे, शासनाची अपेक्षा धरू नका, आपले मित्र मंडळी, नातेवाईकांना भेटायला सुरुवात करा. आपल्या आजूबाजूच्या परिसरात फिरायला जा, शासनाने आपल्या मनामध्ये जी करोनाची भीती घातली आहे, ती कमी होण्यास सुरुवात होईल. त्यामुळे आपोआपच आपल्या सामाजिक जीवनाला सुरुवात होईल, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
***