1 मे महाराष्ट्र दिन विशेष :-
असा हा तो पवित्र महाराष्ट्र दिन ।
मराठीला दिली वेगळ्या अस्मितेची खून । ।
निसर्ग असो कला असो,
असो साहित्य आणि इतिहास
महाराष्ट्रीयन संस्कृतीचा दिसतो
यांतच मराठमोळा सहवास । । १ । ।
राजेंच्या इतिहासाचा पुरावा,
देतील येथील गडकोटांच्या
महाराष्ट्रीयन स्वांतत्र्य स्वराज्याची
ज्यांनी रोवली होती महूर्तमेढ । । २ । ।
मराठी साहित्य परंपरा येथे
येथे संता पासून रुजली
नव्या परस्थितीला वाचा फोडत
ती नवं साहित्यांमधुन ही सजली । । ३ । ।
नाट्य कला आणि परंपरा,
महाराष्ट्रीयन संस्कृतीचे धन
अजिंठा वेरूळच्या शिल्पकृती,
सर्वांचेच वेधुन घेती मन । । ४ । ।
निसर्ग सौंदर्यांतेने भरली सह्यिद्रीची दरी
निसर्गाची विविधता येथे कणाकणांवरी
कोठे भुयी सपाट तर कोठे खोल दरी
शिखर आणि टेकड्यांची त्यात भर तरी । । ५ । ।
- अक्षय मुळे मो. 76205 21257