'आत्मनिर्भर भारत अभियान'साठी जीडीपीच्या 10 टक्के तरतूद, 20 लाख कोटींचं पॅकेज जाहीर - नरेंद्र मोदी



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण सुरू झालं आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन याबाबत ते काय भूमिका मांडत आहेत, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.




लॉकडाऊनचा तिसरा टप्पा येत्या 17 मे रोजी संपत आहेत.




नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :





  • कोरोनाशी लढाईला चार महिने उलटले आहेत.




  • आता आपल्याला आपला संकल्प अधिक बळकट करायचा आहे.

  • एवढं मोठं संकट कधी बघितलं नव्हतं, ऐकलं नव्हतं

  • एकविसावं शकत भारताचं असेल, हे स्वप्नच नाही, तर आपली जबाबदारी आहे. यासाठी एकच मार्ग आहे - 'स्वावलंबी भारत'

  • आपण राष्ट्र म्हणून महत्त्वाच्या टप्प्यावर उभे आहोत. हे संकट आपल्यासाठी संधी घेऊन आलं आहे. आपण रोज 2 लाख पीपीई किट्स बनवत आहोत. आपण संकटाच संधीत रूपांतर केलंय.

  • अर्थकेंद्री जागतिकीकरण विरुद्ध मानवकेंद्री जागतिकीकरण अशी चर्चा आता सुरू आहे.

  • आमच्या स्वावलंबीपणाच्या व्याख्येत आत्मकेंद्रीपणा येत नाही. आम्ही 'वसुधैव कुटुंबकम' या उक्तीवर विश्वास ठेवतो. भारताच्या प्रगतीच्या संकल्पनेत नेहमी विश्वकल्याणाचा विचार असतोच.

  • जगात आयुष्य आणि मरणाची लढाई सुरू असताना भारतातली औषधं जीव वाचवत आहेत. भारतीयांना याचा अभिमान आहे.

  • एकेकाळी देशात सुवर्णयुग होतं. त्यानंतर पारतंत्र्य ओढावलं. आता भारताकडे सामर्थ्य आहे. आपण उत्तम उत्पादनं निर्माण करू. हे आपण करू शकतो आणि नक्की करू.

  • भारतीयांनी ठरवलं तर कोणतंही उद्दिष्ट कठीण नाही.

  • आत्मनिर्भर भारत पाच खांबांवर उभा राहील - अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाधारित व्यवस्था, आपली डेमोग्राफी आणि मागणी.

  • मागणी-पुरवठ्याची साखळी मजबूत करू.

  • विशेष पॅकेजची घोषणा करत आहे - 'आत्मनिर्भर भारत अभियान'अंतर्गत 20 लाख कोटी रुपयांचं हे पॅकेज आहे. हे भारताच्या जीडीपीचं जवळपास 10 टक्के आहे. 20 लाख कोटी रुपयांचं हे पॅकेज आत्मनिर्भर भारत अभियनाला 2020मध्ये नवी गती देईल. गृहउद्योग, छोटे, मध्यम आकाराच्या उद्योगांसाठी हे आर्थिक पॅकेज आहे. अर्थमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान पॅकेजची माहिती देतील.

  • धाडसी सुधारणा कराव्या लागतील. सुधारणांची व्याप्ती वाढवावी लागेल. शेतीच्या पुरवठा साखळीत सुधारणा होतील. सुधारणा करांमध्ये होतील. या सुधारणा उद्योगांना शक्ती देतील आणि गुंतवणुकीला चालना देईल.

  • संकटाच्या वेळी स्थानिक उत्पादकांनीच आपल्याला वाचवलं. वेळेने आपल्याला शिकवलं आहे की स्थानिक उत्पादनच आपलं जीवनमंत्र बनवायचं आहे. आजपासून प्रत्येक भारतीयाने लोकलसाठी व्होकल व्हायचंय. स्थानिक उत्पानदं घ्यायची आहेत आणि त्यांचा प्रचार करायचा आहे.

  • कोरोना मोठ्या काळासाठी आपल्या जीवनाचा भाग असेल, असं शास्त्रज्ञ सांगतात. पण याचा अर्थ असा नाही की आपलं आयुष्य फक्त कोरोनाभोवतीच फिरेल. आपण अंतर राखून काम करू.

  • लॉकडाऊन 4 हे आधीच्या लॉकडाऊनपेक्षा वेगळं असेल. नियमांचं पालन करत आपण कोरोनाशी लढू आणि पुढेही जाऊ.



सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हीडिओद्वारे चर्चा -





  • सोमवारी पंतप्रधानांनी मॅरेथॉन बैठकीत विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. काही मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचं आवाहन केलं होतं.





  • सोमवारी पंतप्रधान मोदी आणि देशभरातील मुख्यमंत्र्यांची पाचवी बैठक झाली. या बैठकीत राज्यांना निर्णय घेण्याचे अधिकार मिळावेत अशी मागणी करण्यात आली आहे.





  • राज्यातील रेड, ग्रीन, ऑरेंज झोन ठरवण्याच्या अधिकारापासून ते मजूरांच्या प्रवासाबाबतचे निर्णय घेण्याचे अधिकार राज्यांकडे देण्यात यावे, अशी भूमिका विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मांडली.




***