क्रूर भावनेतून 11 वर्षाच्या मुलीची हत्या...


हिंगोली प्रतिनिधी : नांदुसा येथील बौद्ध समाजातील शिवाजी कांबळे (वय 45) ह्यांना चार अपत्य आहेत. त्यापैकी त्यांच्या मोठ्या मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळयात अडकण्यास, शिवाजी कांबळे यांच्या प्रियंका (वय 11 वर्ष) हीचा अडथळा निर्माण होत असल्याने आरोपी बालाजी उर्फ गोपाल प्रेमदास आडे याने प्रियंका घरी एकटी असतानाची वेळ साधून ब्लेड ने क्रूर भावणेतून प्रियंकाची 21 मे रोजी हत्या केल्याचा प्रकार घडला आहे.


     302,अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम 1989 3(2)(पाच) नुसार आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी प्रियांका चे वडील शिवाजी कांबळे ह्यांनी प्रशासनाकडे विनवणी केली आहे.


सध्या हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात बौद्ध समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. एकांबा येथील निळा ध्वजाची झालेली विटंबना, आसोला(वाकळी) येथील टिक टॉक वरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना प्रकरण, पार्डी(बागल) येथील खोब्राजी मगरे संशयित मृत्यू प्रकरण अशा विविध घटनां मध्ये वाढ होत आहे, तेव्हा जिल्हा प्रशासनाने व पोलिस प्रशासनाने होत असलेल्या घटनांची गंभीर्याता लक्षात घेऊन त्वरित या परिस्थितीला वचक बसण्याकरीता कारवाई करावी अशी आंबेडकरी समाजातून मागणी होत आहे. 
***