ऑनलाइन शिक्षणासाठी 12 नवीन चॅनल


सरकारने 2 महिन्यांत शाळांसाठी 3 चॅनेल सुरु केले असल्याची माहिती आज निर्मला सितारमण यांनी दिली आहे. तसंच पुढील काही दिवसात आणखी 12 चॅनेल शाळांसाठी सुरु करणार आहे. शिक्षकांचे LIVE वर्ग चॅनेलवर दाखवले जाणार आहेत. हे चॅनल टाटास्काय व एअरटेलहीवरही दाखवले जातील. सरकारने ई-पाठशालांतर्गत 200 नवी पुस्तकं आणली आहेत. अशी माहिती निर्मला सितारमण यांनी दिली आहे.


अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सलग पाचव्या दिवशी पत्रकार परिषद घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन विविध क्षेत्रांसाठी या पॅकेजमधून घोषणा करत आहेत. या टप्प्यातील अखेरची पत्रकार परिषद त्यांनी आज घेतली.


आतापर्यंत 4 टप्प्यांमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदांमध्ये अर्थमंत्र्यांनी कोळसा उत्पादनाच्या खासगीकरणापासून ते मुलभूत सोयी सुविधांसाठी 50 हजार कोटींची तरतूद करण्याची घोषणा केली आहे. त्याआधी लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी मोठ्या कर्जाची तरतूद करण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्राला दिलासा देण्यासाठी सरकारने रेरामधील तरतुदी, कर्ज याबाबत सवलती जाहीर केल्या आहेत.


कृषी क्षेत्रासाठीही अर्थमंत्र्यांनी पॅकेजअंतर्गत शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी मोठ्या पॅकेजची घोषणा केली आहे. आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन मनरेगा, आरोग्य, आजार व कोरोनासंबंधी योजना, उद्योगसुलभता, सार्वजनिक क्षेत्रासाठी धोरण या संदर्भात घोषणा केली आहे.


***