अर्थशास्त्र आम्हालाही समजतं; फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीची करणार आज चिरफाड -शिवसेना


काल देवेंद्र फडणवीस यांनी जी काही आकडेवारी मांडली त्या आकडेवारीची चिरफाड आज करणार असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. इतकंच नाही तर अर्थशास्त्र आम्हालाही समजतं असाही टोला परब यांनी लगावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या आकडेवारीची आज सविस्तर पोलखोल करणार असल्याचंही परब यांनी स्पष्ट केलं. काल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारने महाराष्ट्राला किती निधी दिला ते सांगितलं. त्याची सविस्तर रुपरेषाही दिली. त्यानंतर अनिल परब यांनी एक व्हिडीओद्वारे आज फडणवीस यांच्या आकडेवारीची पोलखोल करणार असल्याचं म्हटलं आहे.
***