हिंगोली जिल्ह्यासाठी दिलासादायक बातमी : कोरोनामुक्त 33 रुग्णांना डिस्चार्ज, आता जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 वर...


आजपर्यंत एकूण 81 रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आलेल्याना दिला डिस्चार्ज.



  • बाधीत 10 रुग्णांची सद्यस्थितीत प्रकृती स्थिर.


हिंगोली,दि.15: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयतील आयसोलेशन वार्डमधून राज्य राखीव बलाचे 32 जवान तर जिल्हा सामान्य रुग्णालयामधील 01 अधिपरीचारीका कोरोनामुक्त झाल्याने आज एकूण 33 रुग्णांना डिस्चार्ज देवून घरी सोडण्यात आले. तसेच आज रोजीपर्यंत जिल्ह्यात कोवीड-19 चे एकूण 10 रुग्ण बाधीत असून त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरामार्फत औषधोपचार सुरु असुन सर्वांची प्रकृती स्थिर आहे.


नागरिकांनी सतर्क राहून कोरोना विरुध्द लढ्यासाठी सोशल डिस्टन्सींगच्या नियमाचे पालन करावे. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घरी थांबून आपले आणि आपल्या कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घेवून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 


****