डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाने विद्यार्थ्यांची परिक्षा फी, विद्यापिठाच्या राखीव फंडातून भरावी- सम्यक विद्यार्थी आंदाेलन


आपण सर्वजण काेरोनाच्या संकटामुळे लाॅकडाऊनच्या चौथ्यास्टेज मधून जात आहाेत. सर्वत्र संक्रमण वाढत चालले आहे.जाे पर्यंत परिस्थितीत अमूलाग्र बदल हाेत नाही ताे पर्यंत काेणत्याही विद्यापिठाने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाने एकतर्फी परिक्षा जाहीर केल्या,विद्यार्थी आपआपल्या गावी आहेत. नेटवर्क नाही, त्यामुळे परिक्षा फाॅर्म भरण्याची तारिख विद्यार्थ्यांना समजलीच नाही. त्यामुळे लेट फी तत्काळ माफ करावीआज सकाळ पर्यंत परिक्षा लेट फी रू.१५००/ विद्यापिठाच्यावेब साईटवर दिसत आहे.परिक्षा लेट फी माफ करावी, पण परिक्षा शुल्कही माफ करावे. कारण या विद्यापीठांत शिक्षण घेणारा विद्यार्थी वंचित समूहातील आहे. लाॅकडाऊनमुळे पालकांचा राेजगार गेला आहे.अशा परिस्थितीत सर्व फी माफ करावी , विद्यापीठाच्या राखीव फंडातून ही फी माफीची रक्कम भरावी आणि विद्यार्थ्याला सहाय्य करावे.महाराष्ट्र राज्यातील सर्वच विद्यापिठातील फी माफी व्हावी, अशी सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी आहे. त्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे.


परिक्षा फाॅर्म भरण्याची तारिख वाढवावी. सर्व तर्हेच्या त्रासातून विद्यार्थी वर्गाची सुटका करावी. अशी मागणी विद्यापिठ प्रशासनाकडे   सम्यक विद्यार्थी आंदाेलन प्रदेशाध्यक्ष महेश भारतीय यांनी केली आहे. 
***