दुसऱ्याला दुःख देऊन,
तू कसा सुख मिळवशील माणसा?
दुसऱ्याला वेदना होताना, तुला जाणीव का होत नाही?
नंतर वेळ गेल्यावर तुला उणीव भरता येणार नाही!
दिले तू गरजूंना दुःख, तुल हाव सुखाची कशी काय आहे,
बोल मानवा तुझ्या चांगल्या कर्माचा आकडा किती आहे?
आज आहे पैसा तुझ्या कडे, तर खाऊन पिऊन अन्न फेकत आहेस,
तुझ्या घरातील कुत्र्यांना महागाच्या अन्नाचा खुराक आहे,
आजही गोरगरीब भुकबळीने मरत आहे!
आणि तूला सुखाची हाव कशाच्या आधारावर आहे?
दिन-दुबळ्यांची कीव तुला कधी आली नाही,
कदाचित तुला तशी शिकवणच मिळाली नाही!
जनावरांची फिकीर आता तुला वाटू लागली आहे,
कदाचित तुला माणसापेक्षा जनावर मोठी वाटू लागली आहे!
जीवन भर पैसा पैसा करून, सुखासाठी जमवला पैसा तू,
शेवटी तुझ्याच ऑपरेशनला भरला कोटींन पैसा तू!
परंतु माणसा नियतीचा मारा कधी चुकत नाही,
दुष्कर्माचे फळ कधीही चांगले मिळत नाही!
कधी विचार करशील माणसा,
धर्माच्या चार भिंतीत राहून विचार का खुंटवतो माणसा?
धर्मानी तर अनेकांचा डाव साधून दिला माणसा,
किती दिवस धर्माच्या नावाखाली बळी घेशील आणि देशील माणसा?
नियतीनेही आता डाव साधून, तुझ्या कर्माचा हिशोब काढला आहे!तुझ्या देवानेही दरवाजे बंद करून तुला अग्नीवर बसवला आहे,
आता तुझ्या कर्माचे फळ तुला मिळणार आहे,
आता तुझी सुटका होणे अवघड आहे.
दुसऱ्याचे घर जाळूनी, स्वतःच्या घरात सुखाने कसा राहशील रे माणसा
नियतीला बदलण्याचा डाव कसा जिंकशील रे माणसा?
"एक दिवस कर्माचे फळ मिळतच असते",
हा नियम कसा विसरलास रे माणसा?
- राजरत्न बलखंडे
M.A Economics
Mo.8530451799
***