गुलाबराव नारायणराव घुगे कोथळकर यांनी गरीब गरजू जनतेला राशन व मास्क केले वाटप


हिंगोली प्रतिनिधी दि.१४: आज कोरोनाच्या संकटामुळे सर्व मानवाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. काही जणांना तर यामध्ये स्वतःचा जीव गमवावा लागत आहे. या संसर्गजन्य रोगाचा प्रतिकार करण्यासाठी सर्व स्तरातून युद्धपातळीवर प्रयत्न केल्या जात आहे, तरी आपण कुठेतरी कमी पडत आहोत याकडे सर्वांचे लक्ष असणे आवश्यक आहे. या कोरोनाच्या संकटामुळे मोलमजुरी करणारा मजूर वर्ग अनेक अडीअडचणीला मोठ्या धैर्याने तोंड देऊन कसंतरी जीवन जगत आहे. लॉकडॉउनमुळे त्यांच्या हाताला काम नाही, खिशात पैसा नाही, म्हणून खाण्यास मिळत नाहीये, अशा वाईट परिस्थिती त्यांना वेळेवर धावून मदत करण्यासाठी गुलाबराव नारायणराव घुगे कोथळकर यांनी गरीब गरजू जनतेला जमेल तेवढे राशन व त्यांच्या संरक्षणासाठी शंभर मास्कचे वाटप केले.
       याप्रसंगी सा. तेजस्वी लेखणीचे संपादक प्रा. बलखंडे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, परदेशात अडकलेल्या लोकांना विमानाने आणण्यासाठी केंद्र शासनाकडे पैसे आहेत, परंतु कष्टकरी मजदुरांना त्यांच्या गावाकडे नेऊन सोडण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीयेत! सर्वजण फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. म्हणून नाईलाजाने हे मजूर पैदल गावाकडे जात असताना मृत्युमुखी पडत आहेत. नंतर केवळ दुःख व्यक्त करून त्यांच्या कुटुंबीयांना मदत देऊन काही उपयोग नाही, करायचे असेल तर त्यांनी त्वरित मदत करावी. त्यांचा तळतळाट घेऊ नये! असे आव्हान या निमित्ताने करण्यात आले.


***