नवी दिल्ली : सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संस्थेने बेरोजगारीची ताजी आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार ३ मे रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील बेरोजगारीचा दर २७. १ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. लाॅकडाउनमुळे हाताला कामच उरलं नसल्याने महिनाभरात १२ कोटी २० लाखांहून अधिक कामगा बेरोजगार झाले आहेत. गेल्या काही वर्षांतील बेरोजगारीचा हा उच्चांकी स्तर आहे. यात मजुरी करणारे आणि दैनंदीन कमाई करणाऱ्या कामगारांना लॉकडाउनची मोठी झळ बसली असल्याचे 'CMIE' ने म्हटलं आहे. बेरोजगारी वाढल्याने विरोधकांना आयत कोलीत मिळाल असून केंद्र सरकारला जाब विचारण्याची शक्यता आहे.
दरम्यान, असंघटीत क्षेत्रापाठोपाठ आता कॉर्पोरेट आणि स्टार्टअप , छोटे मोठे उद्योग यांनीही नोकर कपातीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात बेरोजगारी आणखी वाढेल, असा इशारा त्यांनी दिला. लघु आणि मध्यम उद्योग, ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्या, वाहन क्षेत्र, एफएमसीजी, स्थावर मालमत्ता या क्षेत्रातील कंपन्यांना मंदीचा जबर फटका बसला आहे.
या श्रमिकांच्या हाताचे उत्पन्न गेले -
छोटे व्यावसायिक, फेरीवाले, बांधकाम मजूर, हाताने रिक्षा ओढणारे , हमाल अशा दैनंदिन कमाई करणाऱ्या कोट्यवधी श्रमिकांची रोजीरोटी लॉकडाउनमुळे बुडाली असे CMIE ने आपल्या अहवालात म्हटलं आहे.
नोकरी शोधण्याचे प्रमाण वाढले-
नोकरी गमावणारे वाढले आहेत. तसेच नोकरी शोधणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढले आहे, असे CMIEच्या अभ्यासातून दिसून आले आहे. नोकरी शोधणाऱ्यांचे प्रमाण ३६.२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.
***