Good news: भारताचा रिकव्हरी रेट ४७.७६ टक्के, ४६१४ रुग्णांना डिस्चार्ज


रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण वाढले


करोना व्हायरसची लागण झाल्यानंतर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. आता करोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ४७.७६ टक्के आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती दिली.


मागच्या २४ तासात ४,६१४ रुग्ण करोना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण ८६ हजार ९८३ रुग्ण करोनामधून पूर्णपणे बरे झाले आहेत. यामुळे रिकव्हरी रेट ४७.७६ वर पोहोचला आहे. ८९ हजार ९९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.


***