IBPS Clerk Exam मध्ये सौरभ अनिल कांबळे यांच्या घवघवीत यशा बद्दल मित्र-परिवारातून अभिनंदनाचा वर्षाव


पुणे : Institute of Banking Personnel Selection (IBPS) Exam 2020 मध्ये सौरभ अनिल कांबळे हे पास होऊन महाराष्ट्रात  बँक ऑफ इंडिया मध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या यशा बद्दल फर्ग्युसन महाविद्यालयातील व समाज कल्याण वसतिगृह विश्रांतीवाडी पुणे येथील सौरभ च्या मित्रांनी संघर्ष नरवाडे, राजरत्न बलखंडे, अक्षय कांबळे, दत्ता शंके, आरुष चव्हाण, नवाझ खान पठाण, नावेद खान पठाण, उदय विभांडीक, मारोती नंदिवाले, ओंकार गदवेकर, अवधूत पवार, वैभव, तेजस, सचिन यांनी सौरभ कांबळे यांचे अभिनंदन करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


मूळ चा कोल्हापूर चा सौरभ यानी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात बी. एस्सी. ही पदवी पूर्ण करून पुढे लगेच IBPS चा सातत्याने अभ्यास करत वयाच्या 21 व्या वर्षीच घवघवीत यश संपादन केले. सौरभ शी बातचीत करता ते म्हणाले, 'हे यश म्हणजे माझ्या ध्येयाची एक पायरी मी गाठली आहे, आणखी खूप काही संपादन यश करायचा माझा मानस आहे'.
***