11 मे रोजी जनतेने सभा घेऊन महात्मा ही पदवी दिलेले एकमेव व्यक्ती म्हणजे महात्मा जोतीराव फुले -अजय मगर
हिंगोली :- समाजिक सुधारणे मध्ये अग्रेसर असणारे नाव म्हणजे जोतीराव फुले , समाज सुधारकांच्या इतिहासाची सुरुवातच जोतीरावांपासून होते.समाजातील विषमता,गुलाम गिरी,वर्णव्यवस्था,जातीय व्यवस्था ह्या बाबी बहुजन समाजाच्या अज्ञानामुळे आहेत हे सर्वप्रथम ओळखण्याच काम फुलेंनी केल आहे.वैदिक परंपरा नाकारून सत्यशोधक पद्धत त्यांनी समाजाला बहाल केलेली आहे समाज ती स्वीकारायला अजून तरी तयार नाही तो भाग वेगळा.
स्त्री शिक्षण, स्त्री स्वातंत्र्य , या गोष्टी फक्त महात्मा फुले यांच्या मुळे शक्य झाल्या.जीवन भर सर्व प्रकारच्या विषमता , अंधश्रद्धा , कर्मकांड याला विरोध करुन नवसमाज निर्मितीचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे .
सार्वजनिक सत्यधर्म, विश्वकुटुंब वाद या गोष्टी त्यांची जागतिक दूरदृष्टी दर्शविणाऱ्या आहेत.त्याचा कार्याचा गौरव
दि.11 मे 1888 रोजी महाराष्ट्रातील दुसरे समाजसुधारक रावबहादुर विठ्ठलराव कृष्णाजी वडेकर यांच्या हस्ते मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेने जोतीबा फुलेंना "महात्मा" ही पदवी प्रदान केली.
आणि त्यामुळेच आपण सर्व जन महात्मा जोतिबा फुले असे उच्चार करतो.म्हणुन जोतीबा फुले यांच्या नावापुढे महात्मा हि पदवी लावतो.
महात्मा ही पदवी देवून केलेला गौरव म्हणजे भारतीय इतिहासातील सर्वात मोठी घटना होय.महात्मा फुलेंना दिलेली महात्मा ही पदवी भारतरत्न पुरस्कारापेक्षा ही मोठी आहे.
जनतेने सभा घेऊन महात्मा ही पदवी दिलेले एकमेव व्यक्ती म्हणजे महात्मा जोतीराव फुले होय
त्यामुळेच 11 मे सर्व सामाजिक संघटना,राजकीय पक्ष,विविध संस्था,व फुलेप्रेमी 11 मे मोठा उस्तावाने साजरा केला जातो.
11 मे महात्मा दिवस राज्य स्तरावर साजरा करत शासनाने जाहिर सुट्टी द्यावी यासाठी सरकारच लक्ष वेढण्यासाठी 2006 पासुन संत सावता माळी युवक संघ प्रयत्न करत आहे त्याचा सोबत 2019 पासुन सावता सेना पण प्रयत्न करत आहे
पन सुरुवात हि स्वतः पासुन केली पाहीजे,तेव्हाच आपण दुसर्यांना सांगु शकतो..त्यामुळेच या येत्या ११ मे २०२० रोजी सर्व फुलेप्रेमींनी व फुले दाम्पत्याच्या विचारावर जिवन व्यतीत करणार्यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करुन तसेच महात्मा दिनानिमित्त फुले दाम्पत्यांचे विचार जनमाणसात पोहचविण्याचे कार्य करुन...
"महात्मा दिन" साजरा करावा.
मिञांनो..आपण सर्वजन "महात्मा दिन" साजरा करनारच आहोत,ईतरानांही साजरा करायला सांगुयात व महात्मा दिनाचे महत्त्व पटवुन देऊयात ..
(आपआपल्या भागातील तहसिलला व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन व्यापक स्वरुपात व प्रशासकीय स्तरावर "महात्मा दिन" साजरा होण्यासाठी प्रयत्न करुयात)असे आवाहन सावता सेना युवक आघाडीचे प्रदेश महासचिव अजय मगर यांनी केले.
पुढे बोलताना मगर म्हणाले कि फुलेप्रेमींनी आप आपल्या घरी महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांनी लिहिलेले ग्रंथ, कांदबरी, त्यांचे लिखाण वाचून उदा. शेतकऱयांचे आसूड, ब्राम्हणांचे कसब, गुलामगिरी, संसार, सार्वजनिक सत्यधर्म पुस्तिका, छत्रपती शिवरायांचा पोवाडा, त्या प्रमाणे त्याचे अनुलोकन करून, समस्त मानव जातीला त्यांचे आचार विचार पटऊन त्या प्रमाणे वागून, जाती भेदाचे राजकारण बाजूला ठेऊन साजरा करा.
संपूर्ण जगावर तसेच आपल्या देशावर ज्या कोरोना सारख्या महामारी विषाणू पासून हाहाकार झाला आहे, कित्येक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, त्यामुळे सरकारने जे निर्देश दिले आहेत त्याचे सर्वांनी पालन करा, जरुरी असेल तरच घरा बाहेर निघा, 1 मीटर अंतर ठेवा, NOSE मास्क चा वापर करा, हात स्वच्छ धुवा,सर्वांनी राज्य व केंद्र सरकारने केलेले आव्हान तसेच लागू केलेले आदेश, निर्देश, लॉकडाऊन याचे पालन करा..
तसेच त्याप्रमाणे यासाठी होणारा खर्च, आपण करणारा खर्च न करता संपूर्ण देशावर आलेल्या ह्या कोरोना सारख्या महामारी विषाणू पासून बचाव करण्यासाठी लागणाऱ्या सोई सुविधा व समाजोपयोगी उपक्रमांसाठी खर्च करावा असे आवाहन यावेळी मगर यांनी केले.
***