मुंबई : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद शहरात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या नमस्ते ट्रंप कार्यक्रमात लाखों लोक एकञ जमविले.५००० हजार अमेरीकन्स आले.करोनाचा प्रसार केला.
तबलगींचा व्हिसा का रोकला नाही?
दिल्लीत तबलीगींच्या काॅनफरन्सला विदेशातून असंख्य विदेशी प्रतिनिधी आलेत. ते येणार आहेत हे सर्व नरेंद्र मोदीजीना माहित होते. विदेशी एंबशी कडून तबलीगींचे व्हीसा मोदीजीने थांबविले असते तर कोरोना दिल्लीत पसरला नसता.त्यांनी दुर्लक्ष केले. नंतर सनातन हिंदूना खूष करण्यासाठी तबलीगींवर गुन्हे दाखल केलेत.
कोरोना चा सेंटर पाॅंईट भारतातील मोठी शहरे आहेत.शहरात कोरोना प्रसाराला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत.
मुंबई वर्किंग टाईम टेबल मध्ये बदल करा-
मुंबईत वर्किंग टाईम टेबलमध्ये बदल करावा.म्हणजे गर्दी होणार नाही.जे लोक घरूनच काम करू शकतात त्यांना तीन महिने घरूनच काम करू द्यावे. त्यांनी प्रवास करण्याच्या भांडगडीत पडू नये. ज्यांची कामासाठी फिजिकल उपस्थिती आवश्यक आहे त्यांनाच मुंबईत प्रवासाची परवानगी द्या.
भितीदाखवून घाबरवू नका.पर्याप्त आरोग्य सूविधा सर्वांना द्या-
सरकारने व मिडीयाने जनतेला कोरोनाची भिती दाखवू नये.
सरकारने डाॅक्टर्स,नर्सेस,स्वच्छता कर्मी,संबंधित कर्मचारी यांना स्वरक्षणाची सर्व उपकरणे व साधन सामुग्री पुरेशा प्रमाणात प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून द्यावी.
सरकारने सामान्य जनतेला मोफत व पर्याप्त प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी. टेस्टिंग,बेड्स,आयसीयु बेड्स, व्हेंटीलेटर्स,औषधे, आवश्यक उपकरणे, आक्सिजन सिलेंडर्स ई.एंबूलन्स सुविधा सर्व हाॅस्पिटल मध्ये पर्याप्त प्रमाणात द्यावी.
मुंबईत भाजप मा.राज्यपाल भेटी सत्तेसाठी -
भाजप नेते मुंबईत राज्यपालांची भेट सतत घेत आहेत. त्यांच्या भेटी जनतेसाठी व कोरोना नियंञनासाठी नाहीत. राज्य सरकार विरूध्द षडयंञ करून सरकार पाडण्यासाठी आहेत. सरकार मधील काही लोकांची त्यांना साथ आहे. भाजप सत्तेसाठी राजकारण करीत आहे.
मी कोरोना पूर्वीही भित नव्हतो. आताही भित नाही. जनतेनेही कोरोनाला भिवू नये. फक्त योग्य काळजी घ्या.
नरेंद्र मोदीजी भिञे पंतप्रधान आहेत -
अनप्लॅन्ड लाॅकडावून मुळे असंख्य प्रश्न निर्माण झालेत. नरेंद्र मोदीजी भिञे पंतप्रधान आहेत. ३१ मे नंतरच्या लॅकडाऊनची सर्व जबाबदारी ते राज्यावर टाकून मोकळे होतील.
जनतेचे मनोबल खच्चीकरण थांबवा-
लाॅकडाऊन मुळे लोकांचा डायट (आहार) संपूर्णपणे बदलला. एरवी जनतेचा फिरण्याने जो व्यायाम व्हायचा तो बंद झाला. बीपी,शूगर अन्य आजार असलेल्या लोकांना डाॅक्टर्स हात लावत नाहीत. तपासत नाहीत. कोरोना टेस्ट करून या असे सांगतात. जनतेचे मनोबल खचत आहे.
कोंडून असल्याने मानसिक परिणाम होत आहे.श्रमिकांची विदारक स्थिती सरकारने केली आहे.त्यांना लाचार केले आहे. आर्थिक व सामाजिक प्रश्न निर्माण झालेत. हे सरकाने लक्षात घ्यावे.
आता लोक घरात थांबणार नाहीत. सरकारने जनजीवन सुरू करण्यासाठी पावले उचलावीत." अशी मागणी एड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केेली आहे.
***