फडणवीस यांनाही आपली चूक लक्षात आली. त्यानंतर तातडीने ते ट्वीट डिलीटही करून टाकण्यात आले आहे.
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यामुळे राज्यभरात शाहू महाराजांना अभिवादन केलं जात आहे. पण, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराजांना अभिवादन करताना मोठी चूक केली आहे.
छत्रपती शाहू महाराज यांचा आज स्मृतीदिन असल्यामुळे राज्यातील नेते मंडळीपासून सर्वसामन्य नागरिक शाहू महाराजांना अभिवादन करत आहे. सोशल मीडियावर शाहू महाराजांना अभिवादन करत नेते मंडळींनी पोस्ट टाकल्या आहे.
शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी फडणवीस यांनी त्यांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शाहूंच्या कोल्हापूरनगरीतून नागरिकांनी फडणवीस यांच्या या कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
ट्वीटरवही नेटीझन्सनी फडणवीस यांच्या या कृतीचा निषेध व्यक्त करत टीका केली आहे. फडणवीस यांनाही आपली चूक लक्षात आली. त्यानंतर तातडीने ते ट्वीट डिलीटही करून टाकण्यात आले आहे. त्यानंतर फडणवीस यांनी शाहू महाराजांबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे.
परंतु, शाहू महाराजांबद्दल चुकीचं ट्वीट करूनही अद्याप फडणवीस यांनी कोणत्याही प्रकारची दिलगिरी अथवा माफी मागितली नाही. त्यामुळे ट्वीटवर त्यांच्याविरोधात तीव्र नाराजी पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजपच्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोलचा सामना करावा लागला आहे. परंतु, यावेळी विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी स्वत: चूक करून टीकेचे धनी झाले आहे.
***