हिंगोली SRPF चे सहाय्यक समादेशक श्री रविंद्र बळीराम जाधव यांच्यावर EPIDIMIC ACT अन्यवये गुन्हा दाखल करावा- शेख नईम शेख लाल


हिंगोली : हिंगोली SRPF चे सहाय्यक समादेशक श्री रविंद्र बळीराम जाधव, वय 57 वर्ष हे दि.26.04.2020 रोजी पासून 28 दिवसा करिता "इन्स्टिटयूशनल कोरोनटॉयन" मध्ये असताना हि बाब लपवून दि. 07.05.2020 रोजी अंदाजे दुपारी 12.00 वा च्या वेळी खोटी व बनावटी फिर्याद देण्या करिता शहर पोलीस स्टेशन येथे येऊन तेथील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना बाधित करून सर्वांचे जीव धोक्यात घातलेले आहे. म्हणून श्री रविंद्र बळीराम जाधव, वय 57 वर्ष यांच्या विरुद्ध माहिती लपविल्या बद्दल तसेच EPIDIMIC ACT अन्यवये गुन्हा दाखल करावा व त्यांच्या संपर्कात आलेले शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक, PSO, व इतर सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनटॉयन करण्यात यावी अशी मागणी विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिल हिंगोली संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांनी एका निवेदनाव्दारे शासनास केली आहे. नसता यांच्या संपर्कात आलेले सर्व कर्मचारी शहरातील ईतर नागरिक बाधीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या प्रकारची भीती व्यक्त करण्यात आली आहे.


       निवेदनात म्हटल्या प्रमाणे हिंगोली SRPF समादेशक, श्री मंचक ईप्पर सर यांच्या हलगर्जीपणामुळे SRPF च्या जवानांना कोरोनटाईन करतांना ICMR च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्याने 83 जवान कोरोना पॉझीटीव्ह झालेले असून आयसोलेशन वॉर्डात ऍडमिट आहेत, त्यातील काही जवान अती गंभीर असल्यामुळे त्यांना औरंगाबादला हलविण्यात आलेले आहे, त्याच प्रमाणे असेही निदर्शनास येत आहे की वरिष्ठ अधिकारी डिसिप्लिन व कठोर शिक्षा च्या नावाखाली पोलीस कर्मचाऱ्यांन वर सतत अन्याय करत राहतात ज्या मुळे पोलीस कर्मचारी आपले दुःख कोना समोर मांडू शकत नाही, हि अत्यंत दुखद बाब आहे, या सर्व बाबीना घेऊन संदर्भ 1 व 2 च्या निवेदनाअन्वये विराट राष्ट्रीय लोकमंच कौन्सिल (राष्ट्रीय NGO)च्या वतीने मा.मुख्यमंत्री महोदय सह इतर मा. मंत्री महोदय व वरिष्ठ अधिकारी यांना ई-मेल व  वॉट्सअप द्वारे सविस्तर तक्रार दाखल करून त्या जवानांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता.       
                              
     या निवेदनाची दखल घेत मा.मुख्यमंत्री महोदय सह वरिष्ठ अधिकाऱ्यानी चौकशी आदेश दिले व त्यांची चौकशी हि सुरु झाल्याने माझ्यावर दबाव टाकण्याकरिता हिंगोली SRPF चे समादेशक श्री मंचक ईप्पर सर यांनी व जिल्ह्यातील ईतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मिळून हिंगोली SRPF चे सहाय्यक समादेशक श्री रविंद्र बळीराम जाधव, वय 57 वर्ष हे दि.26.04.2020 रोजी पासून 28 दिवसा करिता "इन्स्टिटयूटनल कोरोन टॉयन" मध्ये असताना हि बाब प्रशासनापासून लपवून 07.05.2020 रोजी अंदाजे दुपारी 12.00 वा च्या वेळी खोटी व बनावटी फिर्याद देऊन शहर पोलीस स्टेशन येथे खोटा गुन्हा दाखल करून तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बाधित करून त्या सर्वांचे जीव धोक्यात आणलेले आहे.                                            त्यांनी गुन्हा घडल्याची दि. 06.05.2020 रोजी सकाळी 10.30 वा राज्य राखीव बल गट 12 हिंगोली पश्चिमेस 02.की मी बिट क्र 03 तक्रारीत नमूद केले आहे, त्याच प्रमाणे जेव्हा यांच्या म्हणण्यानुसार गुन्हा 06.05.20 ला घडला तर 26 तास उशीरा का? गुन्हा दाखल करण्यात आला असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिस्थितीची गंभीर्याता लक्षात घेऊन कारवाई करावी, हि नम्र विनंती.
***
संपादन : हसमी सय्यद असगर हुसेन
हिंगोली जिल्हा प्रतिनिधी