‘लॉकडाऊनच्या काळात दारुची दुकानं सुरु ठेवली तर त्याचे विनाशकारी परिणाम भोगावे लागतील’


मुंबई : ‘कोरोना’ विषाणूचा वाढता प्रभाव केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये दोन आठवड्यांची वाढ केली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हा 3 मे पासून 17मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. येत्या 17 मे पर्यंत हा लाॅकडाऊन लागू राहणार आहे.


मात्र लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने दारुची दुकानं आणि पानाची दुकानं सुरु करण्याची सशर्त संमती दिली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.


ट्विटकरत जावेद अख्तर म्हणतात, ‘लॉकडाउनच्या काळात दारुची दुकानं सुरु ठेवली तर त्याचे विनाशकारी परिणाम भोगावे लागतील. दारुमुळे कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणं वाढली आहेत. लहान मुलं आणि महिलांसाठी हा निर्णय त्रासदायक ठरु शकतो’.


दरम्यान, राज्याची अर्थव्यवस्था मृत झाली आहे. यासाठी शासनाने मुंबईतील हॉटेल्स, खानावळ, पोळी-भाजी केंद्र सुरु करावीत जेणेकरून राज्याच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागेल. तर महसुलात वाढ करण्यासाठी ‘वाईन्स शॉपी’देखील खुल्या कराव्यात, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती.
***