मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडून या मुद्द्यावर ट्विट केलं गेलंय. आपल्या गावी पोहोचत असलेल्या सर्व बंधु-भगिनींची राज्य सरकारकडून पुरेपूर देखभाल केली जातेय. आपली कर्मभूमी सोडण्यास बाध्य केल्यानंतर त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करून नाटक करू नका. राज्य सकारकडून आपली पूर्ण काळजी घेतील जाईल, याचा सर्व स्थालांतरीत मजुरांना विश्वास आहे. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारने याची चिंता करू नये, असं ट्विटमध्ये नमुद करण्यात आलंय.
लखनऊः स्थलांतरीत मजुरांच्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशातील भाजपच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. आपल्या कष्टाने महाराष्ट्राच्या विकासात योगदान देणाऱ्या स्थलांतरित मजुरांचा शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकारने छळ केला. लॉकडाऊनमधील संकटाच्या काळात धोका दिला. बेहाल मजुरांना सोडून दिलं आणि त्यांना रस्त्यावरून गावी चालत जाण्यास बाध्य केलं. या अमानवीय व्यवहारासाठी मानवता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कधीच माफ करणार नाही, असं ट्विट योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडून करण्यात आलंय.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' वृत्तपत्रातून स्थलांतरीत मजुरांच्या मुद्द्यावरून भापज आणि भाजप शासित राज्यांवर प्रखर टीका करण्यात आली. भाजपची सरकारं करोना संकटात मजुरांच्या मुद्द्यावर अपयशी ठरली. विशेष करून उत्तर प्रदेशात चालत जाणाऱ्या मजुरांना बंदी घालून त्यांच्याशी अमानवीय व्यवहार करण्यात येतोय, अशी टीका सामनातील लेखातून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलीय. तसंच योगी आदित्यनाथ यांची तुलना हिटलरशी केली.
संजय राऊत यांच्या टीकेला यूपी सरकारने उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडून या मुद्द्यावर ट्विट केलं गेलंय. आपल्या गावी पोहोचत असलेल्या सर्व बंधु-भगिनींची राज्य सरकारकडून पुरेपूर देखभाल केली जातेय. आपली कर्मभूमी सोडण्यास बाध्य केल्यानंतर त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करून नाटक करू नका. राज्य सकारकडून आपली पूर्ण काळजी घेतील जाईल, याचा सर्व स्थालांतरीत मजुरांना विश्वास आहे. महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारने याची चिंता करू नये, असं ट्विटमध्ये नमुद करण्यात आलंय.
संजय राऊतजी, उपाशीपोटी असलेलं मूल शेवटी आपल्या आईलाच शोधत फिरतं असतं. पण महाराष्ट्र सरकारने 'सार्वत्र आई' बनूनही त्यांना आश्रय दिला असता तर महाराष्ट्राची जडणघडण करण्यासाठी झटणाऱ्या मजुरांना राज्यात परतावं लागलं नसतं, असं उत्तर योगी आदित्यनाथ सरकारने दिलंय. उत्तर प्रदेशात येणाऱ्या सर्व स्थलांतरीत बंधु-भगिनींचे खुल्या दिलाने स्वागत आहेत. त्यांना राज्यात रोजगारही उपलब्ध करून दिला जाईल, असंही उत्तर प्रदेश सरकारने शेवटच्या ट्विटमध्ये म्हटलंय.
***