मुख्यमंत्र्यांची रेल्वे, पोर्ट ट्रस्ट, लष्कराला विनंती, आयसीयू बेड्सची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी


राज्यात खासगी रुग्णालये आणि मोठ्या संस्थांच्या जागाही आयसीयू बेड्ससाठी उपलब्ध होत (Covid 19 Hospital ICU Beds Increase) आहेत.


मुंबई : देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत (Covid 19 Hospital ICU Beds Increase) आहे. गेल्या तीन महिन्यांपासून राज्यशासन कोरोनाशी लढा देत आहे. तसेच त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध उपाययोजनाही केल्या जात आहे. चाचण्यांचा वेगही वाढवल्याने रुग्ण संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.


राज्य शासनाने रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर तसेच इतर केंद्र शासनाच्या अखत्यारितील रुग्णालये आणि संस्था यांनी त्यांच्या राज्यभरात सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी विनंती केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: वरिष्ठ पातळीवर बोलत आहेत.


सध्या रुग्णांची संख्या वाढत असून रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणही वाढते (Covid 19 Hospital ICU Beds Increase) आहे. पण केंद्र शासनाने मे महिन्यात कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाने मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये आयसोलेशन आणि आयसीयू बेड्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील याचे नियोजन केले आहे.


त्यानुसार मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स, नेहरू सायन्स सेंटर, नेहरू तारांगण, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर, जे. जे रूग्णालयाजवळील रिचर्डसन कृडास फॅक्टरीची जागा, बांद्रा कुर्ला संकुल इत्यादी ठिकाणी आयसोलेशन आणि आयसीयू बेड्सची सुविधा निर्माण केली आहे.


तसेच राज्यात इतरत्रही मोठ्या शहरांमध्ये पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर ही सुविधा उपलब्ध होत आहे. यामध्ये राज्यात खासगी रुग्णालये आणि मोठ्या संस्थांच्या जागाही आयसीयू बेड्ससाठी उपलब्ध होत आहेत.


लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर आता राज्या राज्यातून महाराष्ट्रातले नागरिक यायला सुरुवात झाली आहे तसेच परदेशांतून देखील नागरिक परतायला सुरुवात होईल. रुग्णसंख्या अधिक वाढल्यास जास्त आयसीयू बेड्सची गरज लागेल.


तसेच इतर वैद्यकीय सुविधा लागतील हे गृहीत धरुन राज्य शासनाने भारतीय रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर, नेव्ही यांना त्यांच्या रुग्णालयांच्या जागा उपलब्ध कराव्यात. तसेच त्यांच्या अखत्यारीतील इतर मोठ्या इमारती आणि जागा उपलब्ध करुन द्याव्यात अशी विनंती केली आहे, असे झाल्यास वाढीव रुग्णांना विलगीकरण करून ठेवता येणे शक्य (Covid 19 Hospital ICU Beds Increase) होईल.


***