हिंगोली/प्रतिनिधी - करोनाच्या जैविक संकटाने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले असुन रब्बी हंगाम हातातुन गेला आता खरीप हंगामासाठी बँका शेतकऱ्यांना पिककर्जा साठी अडवणुक करीत आहे़ जिल्ह्यात आतापर्यंत केवळ साडे तिन टक्के पिक कर्ज वाटप केले आहे़ अशावेळी शेतकरी अडचणीत सापडले असुन शेतकऱ्यांची बँकाकडुन पिककर्जा साठी होणारी अडवणुक थांबविण्याची मागणी खा़.सातव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे़. खासदार राजीव सातव यांनी आज जिल्हाधिकारी यांची भेट घेतली़ त्यांच्या समवेत जि.प गटनेते दिलीप देसाई,जिल्हा बँकेचे संचालक बाबा नाईक,डॉ.सतिष पाचपुते,केशव नाईक,अनिल नेनवाणी,एस.पी राठोड,विलास गोरे,अजय बांगर आदी उपस्थित होते. यावेळी खा़.सातव यांनी हिंगोली जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅकांकडुन शेतकऱ्यांची पिक कर्जासाठी मोठ्या प्रमाणात अडवणुक केली जात आहे़ कोरोनाच्या संकटामुळे आधीच शेतकरी अडचणीत सापडला असतांना शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैसा नाही़ अशावेळी बँका पिक कर्जासाठी उदासिन आहेत़ कर्ज द्यायला बँका तयार नसल्याने शेतकरी खरीप पेरणीपासुन वंचित राहण्याची परिस्थीती आहे़ संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यांना पिक कर्ज वाटपाच्या सुचना बँकाना द्याव्यात अशी मागणी खा़ राजीव सातव यांनी केली़ आहे.
***