एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांनी धान्य वाटपाचा लाभ घ्यावा - पालकमंत्री वर्षाताई गायकवाड


हिंगोली,दि.05:  जिल्ह्यात माहे मे, 2020 करीता उर्वरीत एपीएल केशरी शिधापत्रिका धारकांसाठी 267.14 मे. टन गहु व 178.1 मे. टन तांदुळ असा एकूण 445.24 मे. टन अन्नधान्य शासनाकडुन उपलब्ध झालेले आहे. सदर धान्य गहु 03 किलो व तांदुळ 02 किलो प्रति व्यक्ती अनुक्रमे 08 रु. व 12 रुपये प्रती किलो प्रमाणे वाटप करण्यात येत आहे.


सदर योजनेत समाविष्ठ असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शालेय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी केले आहे.


*****