गरजु कार्यकर्ता, कलावंत,गरिब गरजु कुटुबं मदतीपासुन वंचीत राहु नये या साठी दानदात्यांनी पुढे यावे मोहीमेत प्रत्यक्ष सहभागी व्हावे- प्रकाश इंगोले


      आंबेडकर स्मारक व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून  दिनांक  20 मे  रोजी  आंबेडकरवादी  समाजातील  कार्यकर्ते, कलावंत, गरजू  तसेच विधवा परितक्त्या  अशा कुटुंबाला समाजाच्या माध्यमातून  कोरोना लॉकडाऊन च्या  काळात  काहीतरी मदत व्हावी यासाठी हिंगोलीत एक मोहीम  सुरू करण्यात आली त्या मोहिमेस  दिवसेंदिवस  समाजातील दान दात्यांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.आता मोहिम ऐका व्हाटस्प ग्रुप पुरती मर्यादित राहिली नाहि तर सर्व आंबेडकरवाद्यां पर्यंत पोहचत आहे,अनेक दात्यांच्या दानावर केवळ आठवडा भरात आपण ५२ कुंटुबांना मदत करु शकलो.
       यामध्ये भरीव योगदान हे भंते धम्मशील यांचे आहे त्यांनी दि.२३ मे शनिवार रोजी स्वताःगजानन माॅलवर येवुन १० धान्य कीट चे ६५२० रुपये दिले व त्याच दिवशी गरजुनां त्यांच्याच उपस्थीतीत कीट वाटप करण्यात आल्या.


     आद.दिवाकर माने यांच्या माध्यमातुन सेवानिव्रुत्त ई.जी.प्रकाश धाबे यांनी परिवार माॅलच्या खात्यावर पाचहजार तीन रुपये पाठवीले होते, तसेच srpf कमर्मचारी सर्जेराव इंगोले यांनी रोख स्वरुपात १३०० रुपये माने साहेबांकडे जमा केले,तसेच ईजी.दिपक भालेराव १३००यांनी रक्कम दिली या रक्कमेतुन दिवाकर माने यांच्या माध्यमातुन १२ धान्य कीट वाटप केल्या  आहेत.


       तसेच जे प्राध्यापक व कर्मचारीव्रदं या मोहिमेत सक्रीय सहभागी होवुन यशस्वीरीत्या मोहिम राबवीत आहेत ज्यांच्या माध्यमातुन प्रत्यक्ष दि.२१ मे पासुन कार्यकर्ते व कलावंताना कीट वाटप केले गेले असे प्रा.शत्रुध्न जाधव,ई.जी भिमराव कुरुडे,प्रा.सुखदेव बलखंडे,आर.के.वाकळे व त्यांचे सहकारी यांनी स्वताःतर रक्कम दिलीच शिवाय दानदात्या कडुन रक्कम स्विकारुन गरजु लोकांपर्यतं धान्यकीट पोहचती करीत आहेत ज्या मध्ये दहा किलो गव्हाचेपीठ, दोन किलो साखर, एक किलो तूर डाळ, एक किलो गोड तेल, चहा पावडर, मिरची पावडर, हळद पावडर, मीठ पुडा, साबण याचा समावेश आहे.अशा ३० कीट आज पर्यंत जे गरजू आहेत त्यांचा स्वाभिमान कायम ठेवून कीट वाटप केल्या आहेत यात खालील दात्यांनी भरभरून मदत केली आहे.
1)प्रा.शत्रुघ्न जाधव-2000रु......      2)डाॕ.भगवान पुंडगे-2000रु.....        3)गंगाधर पाईकराव-2000रु.....4)इंजी.सःजय बगाटे-1300रु....5)प्रा.महेंद्र वाढे 1300+700=2000
6)इंजी.बी.के.कुरवाडे-1000रु...7)शेषराव चाटशे-1000रु.........8)अशोकराव खंदारे-1000रु.....9)प्रा.सुखदेव बलखंडे-1000रु..10)राहुल पी.खिल्लारे-1000रु..11)आर.के.वाकळे-500रु........12)समाधान पाईकराव-500रु...13)श्याम नरवाडे-500रु..........14)तुरुकमाने बि.पि.-500रु.....15)सिध्दार्थ गोवंदे-1000रु.......16)डॉ.सुधीर भगत 1000
17)डॉ.नंदिनी सुधीर भगत 1000.
दान दात्यांना मदतीचा ओघ कमी पडू देऊ नका तुमच्या मदतीच्या सहकार्यामुळेच गरजूंची यादी तयार केली जात आहे, आज पर्यंत जी रक्कम जमा झाली त्या रकमेतून गरजुपर्यंत धान्य किट पोहोचती करण्यात आले आहे. असे अनेक कुटुंब आहेत की त्यांच्या घरात हलाखीची परिस्थिती आहे अशा लोकांकडे जेव्हा अचानक पणे समाजाकडून मदतीचा हात दिला जात आहे, त्यांमधून अनेकांनी अक्षरशः डोळ्यातून अश्रू गाळत समाजाप्रती क्रुज्ञता व्यक्त केली आहे म्हणून समाजातील ज्यांची ज्यांची देण्याची परिस्थिती आहे त्यांनी या दान दात्यांच्या यादित आपले नाव समाविष्ट करण्यासाठी पुढे यावे दाना साठी व गरजुचे नाव सुचीत करण्यासाठी या नंबर वर संपर्क करा+91 98222 42262 तसेच दान देण्यासाठी या बँक खात्यावर रक्कम वर्ग कराBank of Maharashtra.Hingoli.AC.20258578126.Shatrughna G.Jadhav.IFSC..MAHB0000036.


      सर्व आंबेडकरवादीनां विनंती आहे की हा मेसेज सर्वा पर्यंत पोहचवावा जेने करुण एकही गरजु मदती पासुन वंचीत राहुनये व दानदात्यालाही या मोहीमेत सहभागी होता याव, असे आवाहन दैनिक सम्राट, हिंगोली जिल्हा प्रतीनीधी प्रकाश इंगोले यांनी केले आहे.
***