हिंगोली: आज संपूर्ण जगामध्ये कोरोनाचे थैमान आहे, त्यात अनेकांचा जीव जात आहे. त्याचा प्रतिकार करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न चालू आहेत. केंद्र शासनाने व राज्यशासनाने आताही आणि यापुर्वीही लॉकडॉउन चे आदेश दिले आहेत. जनता मरणाच्या भीती पोटी लॉक डॉउन नियमांचे पालन करीत स्वतःच्या कुटूंबियांसमवेत आनंदाने जीवन जगत आहेत. परंतु शासनाने स्वतःच्या स्वार्थासाठी सर्वत्र दारूची दुकाने सुरू केल्याने पाहिल्याच दिवशी तळीरामांनी दारूपिण्यासाठी घरातील बेभान होऊन पैसे नसले तरी घरातील समान विकून का होईना दारू मिळवण्यासाठी एकमेकांत अंतर न ठेवता, आपापसात हाणामारी केली, त्यामुळं फिजिकल डिस्टन्स चा फज्जा उडाला. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. जनता सुरक्षित राहावी म्ह्णून आरोग्य अधिकारी, डॉक्टर, नर्स, पोलीस अधिकारी, कर्मचारी, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, रात्रंदिवस झटत आहेत. पोलीस सुद्धा माणूस आहेत, त्यांच्या कामात वाढ करण्यापेक्षा, त्यांच्या जीवाची कदर शासनानी करणे गरजेचे आहे आणि कोरोना त्रस्त परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी ठोस धोरण तयार करने आवश्यक आहे. असे सा.तेेेजस्वी लेेखणी संपादक प्रा. यु.एच.बलखंडे यांनी समाज माध्यमाद्वारे शासनाला आवाहन केले आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे,कोरोनाच्या मृत्यूदरपेक्षा दारू पिणाऱ्यांचा मृत्युदर चार पटीने जास्त आहे. म्हणून गरिबांना दारू पिऊन मरणाच्या संधी कोरोनच्या अगोदर देण्यापेक्षा गोरगरीब जनतेचे प्रश्न मार्गी लावून, त्यांच्या मूलभूत गरजा लक्षात घेता, फक्त लोकडॉउन वाढवत राहण्यापेक्षा धोरणांची निर्मिती करून गरिबांना शिधा पत्रिका देऊन धान्य उपलब्ध करून त्यांना कोरोना पेक्षा प्रखररित्या भेडसावणारा भुकेचा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे. त्यासाठी शहरी भागात नगरसेवकांमार्फत तर ग्रामीण भागात ग्रामपंचायती मार्फत गोरगरिबांच्या अन्नाचा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. असेही प्रा.बलखंडे यांनी प्रतिपादन केले.
***