कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगात मोठी उलथापालथ झाली आहे. साम्राज्यातील सर्वच घटकांना आर्थिकदृष्ट्या मोठा फटका बसला आहे.त्यात येणाऱ्या दिवसात हातावर पोट असणाऱ्या समाज घटकांना कसोटीचा काळ बघावा लागणार आहे.लहान लहान उद्योग धंद्यांना मोठी आर्थिक झळ सोसावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे काही जणांनी काळाची पावले उचलत आपल्या मुळ व्यवसायाच्या व्यतिरिक्त काळानुरूप फायदा देणारा वेगळा व्यवसाय निवडण्याची सुरुवात केली आहे.बिर्याणीवाला, वडापाववाला ,सुतार, चर्मकार,नाभिक व गवंडी इत्यादी लोकांनी भाजीपाला फळे विकायला सुरु केले आहे.त्यांचा मूळ व्यवसाय "बसला"त्यामुळे काळासोबत त्यांनी स्वत:च्या व्यवसायात बदल केला आहे. कारण जे काळानुसार बदलत असतात.तेच टिकत असतात.एक फळवाला त्याने फळांसोबत भाजी देखिल विकायला ठेवलीय.सध्या भाजीला जास्त डिमांड आहे.अशात वंशपरंपरागत पिढ्यानपिढ्या व्यवसाय करणारे नाभिक समाजातील काही सलून दुकांनदार देखील जगण्याची नवी उमेद घेत परिवर्तनाची नवी दिशा शोधत आहे.आपला मुळ व्यवसाय बदलून इतर व्यवसायाकडे वळताना दिसू लागले आहेत.कोरोनाच्या रुपाने आलेल्या आर्थिक धक्याचा हा सकारात्मक बदल आहे.ज्यांने अनेकांना आपल्या जगण्याची धडपड करण्यासाठी नवी उमेद घेत परिवर्तनाची नवी दिशा शोधायला भाग पाडले आहे. यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हिंगोलीचे घेणेकर बंधू आहेत.हिंगोली येथे भांडेगांवच्या सुरेशराव घेणेकर बंधूंचे कटिंग दाढीचे दुकान आहे.पण कोरोणामुळे या कटींग दाढीच्या व्यवसायातुन कोरणाचे विषाणू पसरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या रिपोर्ट प्रमाणे सरकारने कटींग दाढीच्या धंदयावर बंदी घातल्यामुळे सलून बांधवाचा रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.तसेच त्यांनी विचार केला की कटिंग दाढीच्या व्यवसायापासून मला,माझ्या कुटुंबाला परिवाराला,देशाला, माझ्या गावातील लोकांना व माझ्या ग्राहकाला धोका होऊ शकतो.त्यामुळे घेण्कर बंधुनी नवीन व्यवसायाची वाट शोधली आहे.दोन महिने घरी बसून होतो.आता काय करायचे ? घराचा व कुटुंबाचा प्रपंच कसा सांभाळला पाहिजे ? रोजचा खर्च आहे ? होते ते पैसे आता संपले ? दोन महिने बसून खाल्लं ? आता काय करावं ? मूलबाळ आहेत घरी ? आई-वडील आहेत ?दुकानचा व घराचा किराया वाढत आहे ? मुलाबाळांचा दवाखाना ?,मुलाबाळांचे शिक्षण ? व येणाऱ्या काळामधली संकटे ?असे़़एक ना अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती व घर करत बसली होती ?.संकटाच्या काळातही कोणाची मदत स्विकारायची नाही,कोणाचे अन्नधान्य घ्यायचे नाही,कोणा पुढे हात पसरायचा नाही,लाचार होऊन जीवन जगायचे नाही हे त्यांनी मनोमन ठरविले होते.मग आता काय करावे ! तर त्यांनी स्वतःला असे तयार केले व आंबा व्यवसाय विक्रीचा व्यवसाय शोधला व त्यांनी तो निवडला आणि हिंगोली,सावा, खंडाळा,साटबां व भांडेगाव या गावात जाऊन सुरेश घेणेकर व दिपक घेणेकर हे दोघे बंधू आंबे विक्री करत आहेत.या व्यवसाया करिता त्यांना बंडूभाऊ उर्फ शंकर सुरशे डिग्रसकर यांनी सहकार्य केले आहे.या विक्रीतून त्यांनी समाजाला एक नवीन आदर्श घालून दिला आहे की कमी भांडवल आणि संकटाच्या काळात कसे तोंड द्यावे, सन्मानाने कसे जगावे व संकटावर तुटून पडून कशी मात करावी हे त्यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून समाजाला दाखवून दिले आहे.त्यांना सलून व्यवसाया व्यतिरिक्त कोणताच अनुभव नव्हता.पण मनात जिद्द व आत्मविश्वास असल्यामुळे व कुटुंबाची होणारी ताराबंळ थांबविण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला व या निर्णयाला त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे ते रडत बसले नाहीत,पैसा नाही ? भांडवल नाही ?, मी काय करू ?,मला काही येत नाही ? व मी काही करू शकत नाही ? मी वारिक आहे ? इतर व्यवसाय कसा करू ? मला हे जमेल का ? आता माझं कस होईल? ,मला ते जमेल का ?असा कोणताही विचार मनात न आणता त्यांनी आपल्या मनात दृढ विश्वास निर्माण केला की मी हे करणारच आहे ! व या दोघा भावांनी आंबा विक्री या व्यवसायात स्वताला झोकून दिले आहे.त्यांनी आपल्या संसाराचा गाडा सांभाळून कोरोनाच्या काळातही समर्थपणे आंबा विक्रीच्या व्यवसायाच्या माध्यमातून घेणेकर बंधू आपला परिवार आनंदात सांभाळत आहेत.तसेच त्यांनी फोन करून समाजातल्या उपेक्षित व वंचित असलेल्या बांधवाला पण काही अडचण असल्यास मदतीची तयारी दाखविली आहे व सांगितले आहे की समाज बांधवांची काही अडचण असेल तर त्यांना अन्नधान्याची गरज लागली तर मी द्यायला तयार आहे.आज देशावर संकट आले आहे या संकटामध्ये मी देशाच्या काही कामी पडू शकतो का ! ही मानसिकता त्यांनी स्वतःमध्ये बनवून त्यांनी शासनाच्या फंडात काही रक्कम जमा करण्याची तयारीही दर्शवली आहे. शासनाच्या फंडामध्ये पैसे जमा करण्याचे ही त्यांनी यावेळी मनोगत बोलुन व्यक्त केले आहे.
आपल्या नाभिक समाजातील सलून दुकानदारी करणाऱ्या हातावर पोट असणाऱ्या काही लोकांनी आपला पिढ्यानपिढ्याचा वंशपरंपरागत सलून दुकांनदारीच्या धंद्यात बदल करण्याची मानसिक तयारी करून विपरीत परिस्थितीपुढे हात टेकले नाही.हे घेणेकर बंधूनी सिद्ध केले आहे. याचा समाजातील इतर लोकांनीही आदर्श घेतला पाहिजे.या अगोदर ही आपल्या नाभिक समाजातील काही सर्वसामान्य सलून व्यवसाय करणाऱ्या बांधवांनी काळाची पावले ओळखून वेगळी वाट निवडली होती.आज त्यांनी विपरीत परिस्थितीचा सामना करित यश संपादित केले आहे.नाभिक समाजात आज त्यांची नामवंत,प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून गणना केली जात आहे.ज्यांनी अगोदर सलून व्यवसाया व्यतिरिक्त कधीच कोणत्याही प्रकारचा व्यवसाय केला नव्हता किंवा त्याचा साधा विचार ही केला नव्हता आज ते समाजात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून नावा रुपाला आले आहेत.स्वानुभव असलेले जाणकार असे म्हणतात की,संकटासोबत संधी निर्माण होते. कोरोना संकटामुळे सलून व्यवसाय क्षेत्रात जरी अनेक समस्या निर्माण झाल्या असल्या तरी अनेक संधी ही निर्माण झाल्या आहेत.या संधीचा नाभिक समाज्यातील सलून व्यवसाय करणाऱ्या तरुणांनी फायदा घ्यावा.आपल्या अगोदरची पिढी अशिक्षित होती त्यामुळे त्या बिचार्याकडे आपला व्यवसाय करण्यापलीकडे दुसरे साधन नव्हते. पण आजची पिढी शिक्षित आहे.त्यांनी भविष्यातील उद्भवणाऱ्या ‘सलून व्यवसाय क्षेत्रापुढील आव्हाने’ लक्षात घेऊन वेळीच काळाची पाऊले ओळखून शिक्षणाची कास धरावी व समाजातील नामवंत प्रतिष्ठित समाज बांधवांचा आदर्श घेत जगण्याची नवी उमेद घेऊन परिवर्तनाच्या नव्या दिशेने वाटचाल सुरू केली पाहिजे.ही काळची खरी गरज आहे.हा संदेश सुरेश घेणेकर व दिपक घेणेकर या बंधूनी खरा करून दाखवून दिला आहे. या नवीन व्यवसायाचे भांडेगाव परिसरातील सभापती,जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,चेअरमन ,सरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी वर्ग,जिजामाता शिक्षण संस्थेचे पदाधिकारी शिक्षक बांधव व कर्मचारी बांधवांनी व भांडेगाव, सावा,विडोळी, साटंबा व खंडाळा परिसरातील गावकऱ्यांनी घेणेकर बंधूच्या कटिंग गाडी चा व्यवसाय सोडून स्वतःचा, कुटुंबाचा, गावकरी मंडळीचा,ग्राहकाचा चांगला विचार करून व देशातुन कोरणा हद्दपार करण्यासाठी हा आंबा विक्रीचा निर्णय घेतला.कोरोना विषाणू संपवण्यासाठी जो निर्णय घेतला त्या निर्णयाचे व आंबा विक्री या उपक्रमाचे सगळ्यानी मनातून स्वागत केले आहे.
***