आता सर्वोच्च न्यायालयात ऑनलाईन दाखल करा याचिका!


नवी दिल्ली : भारतात सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच रजिस्ट्रीनं एक हेल्पलाईन सुरू केलीय. ही हेल्पलाईन ई-फायलिंगशी निगडीत प्रश्न आणि समस्यांना दूर करण्यासाठी बनवण्यात आलीय. लॉकडाऊनमुळे सर्वोच्च न्यायालय सध्या बंद असलं तरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रकरणांची सुनावणी सुरू आहे. याच दरम्यान, याचिका दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर 'ई-फायलिंग'ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलीय.


परंतु, लॉकडाऊनमध्ये वकील आणि याचिकाकार्त्यांना याचिका दाखल करण्यात अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत आहे. याच समस्या दूर करण्यासाठी एक हेल्पलाईन क्रमांक - १८८१ सुरू करण्यात आलाय. ही हेल्पलाईन सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध राहील. या हेल्पलाईनची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलीय.


सध्या लॉकडाऊन काळात न्यायाधीशांच्या घरातच बेन्च बसतं आणि वकील आपापल्या घरांतून किंवा कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधत सुनावणीत सहभागी होतात. याच मंगळवारी, पायलट प्रोजेक्ट म्हणून न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टरूमध्ये बसण्याची सुरूवात करू शकतात, असं सर्वोच्च न्नायालयानं सुचवलं होतं. इथूनच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रकरणांची सुनावणी होऊ शकते.


दरम्यान, सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे (CJI) यांनी वकिलांना गाऊन किंवा कोट परिधान करण्यास मनाई केलीय. संक्रमण फैलावण्याचा धोका असल्यानं सरन्यायाधीशांनी हे निर्देश दिले होते.


शिवाय गेल्या शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानं आपली उन्हाळ्याची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता १९ जूनपर्यंत न्यायालयाचं कामकाज सुरू राहणार आहे.
***


Popular posts
पोलीस प्रशासनाकडून अरविंद बनसोड मृत्यूचा योग्य तपास न करता मृत्यूस आत्महत्या म्हणून नोंद करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न - प्रकाश आंबेडकर
Image
रमा मातेने केलेल्या महान त्यागामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागतीक महान कायदेपंडीत झाले - श्रीमती पाईकराव
Image
सोनू सूदकडे हजारो मजुरांना घरी पोहचविणारी कोणती यंत्रणा आहे- संजय राऊत
Image
हिंगोली जिल्हा नुतन अप्पर जिल्हाधिकारी शंकर बरगे यांचे स्वागत तर माजी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार यांना निरोप
Image
हिंगोली जिल्यातील कळमनुरी तालुक्यातील जांब गाव कंटेनमेंट झोन घोषित
Image