हिंगोली जिल्ह्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या


सव्वाचार लाख रुपये कर्ज फेडणार कसे, या विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हिवरा जाटू शिवारात घडली. सुभाष भोजे (वय ५१) असे शेतकऱ्याचे नाव आहे.


हिंगोली: चार लाख पंचवीस हजार रुपये कर्ज कसे फेडावे या विवंचनेत असणाऱ्या ५१ वर्षीय शेतकऱ्याने हिवरा जाटू शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, रविवारी सकाळी उघडकीस आली.


कळमनुरी तालुक्यातील सुकळी वळण येथील सुभाष भोजे या शेतकऱ्यावर महाराष्ट्र बँकेचे पीक कर्ज व शेतातील पाईपलाईनसाठी ३ लाख रुपये आणि जीपसाठी खासगी बँकेचे एक लाख पंचवीस हजार रुपये कर्ज थकीत होते. हे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत भोजे होते. नैराश्येतून त्यांनी हिंगोली तालुक्यातील हिवरा जाटू शिवारात असलेल्या गॅस पेट्रोल पंपाच्या पाठीमागील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब आज रविवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. या घटनेची ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
***