UPSC वेळापत्रक जाहीर : पूर्वपरीक्षा 4 ऑक्टोबर, तर मुख्य परीक्षा 8 जानेवारीपासून


कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता परीक्षेसंबंधी नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 


UPSC म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगानं परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. आयोगाकडून त्यासंबंधीचं पत्रक जारी करण्यात आलं आहे. 


त्यानुसार, UPSCची पूर्वपरीक्षा 4 ऑक्टोब 2020 रोजी होणार असून मुख्य परीक्षा 8 जानेवारी 2021 पासून घेण्यात येणार आहे. 


मुख्य परीक्षा 5 दिवस चालणार असून तिची सुरुवात 8 जानेवारीपासून होणार आहे. 



 


***