पर्यावरण दिनानिमित्त राज्यपालांचे राजभवन येथे वृक्षारोपण


            राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राजभवन येथे चाफ्याचे रोप लावले. प्रत्येक व्यक्तीने पर्यावरण संवर्धनासाठी किमान एक रोप लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन राज्यपालांनी केले आहे.